सोलापूर – एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या औचित्य साधून आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँक व एकता बहुउद्देशीय महिला मंडळ संचालित आधार वृद्धाश्रमामध्ये किर्तन सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी कीर्तनकार शामराव महाराज लेंडवे व कु. अरुंधती महाराज गवळी यांचे कीर्तन वृद्धाश्रमामध्ये आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दिगंबर ईप्पलपल्ली, विशाल भांगे, अरविंद मोटे, जगदीश कोरे, रोहित थाळवे इ. पत्रकार मंडळी उपस्थित होती.
यावेळी प्रमुख पाहुण्याच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची पूजन करण्यात आले. शामराव महाराज लेंडवे यांनी मानवाच्या जीवनामध्ये आई-वडिलांचे महत्त्व किती मोलाचे आहे याचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. जीवनामध्ये आई-वडील आजी आजोबा हे जर आपल्या कुटुंबामध्ये असतील तर त्या घराला घरपण आल्यासारखे वाटते. हे वडीलधारी माणूस कुटुंबातील व्यक्तीचे मायेने विचारपूस चौकशी करतात, त्यामुळे कुटुंबातील तरुण व्यक्तींना प्रेरणा देणे, त्यांना प्रेरित करणे, प्रोत्साहन देणे तसेच त्यांचे विचार घेऊन नवीन तरुण पिढी घडवण्यात या वृद्ध व्यक्तींचा वाटा मोठे असतो.
यावेळी कु. अरुंधती महाराज गवळी यांनी आपल्या कीर्तनामध्ये रक्तदान व अन्नदान याचे महत्त्व काय आहे हे पटवून दिले. यावेळी शामराव महाराज लेंडवे यांचा सत्कार विजय छंचुरे यांनी केले व कु. अरुंधती महाराज गवळी यांचा सत्कार नीलिमा हिरेमठ यांनी केला. दिगंबर ईप्पलपल्ली व जगदीश कोरे यांनी सर्व पत्रकार बंधूंचे सत्कार करून आभार मानले.
आस्था फाउंडेशन आस्था रोटी बँकेचे महिला अध्यक्ष नीलिमा हिरेमठ, कांचन हिरेमठ, स्नेहा वनकुद्रे, विद्या माने, सुरेखा पाटील, वैशाली आळंद, आस्था फाउंडेशनचे अध्यक्ष विजय छंचुरे व आधार वृद्धाश्रमाचे व्यवस्थापिका कल्पना कोळी सुनिता कोळी हे सर्वजण उपस्थितीत होते. आस्था रोटी बँक हे नेहमी गोरगरीब गरजू आणि अपंग अशा लोकांना मदतीचे हात पुढे करते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा वनकुद्रे केले तर आभार प्रदर्शन नीलिमा हिरेमठ, कल्पना कोळी यांनी केले.