सांगली; जिल्ह्यातील मिरज येथे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आणि जिल्ह्यातील पहिल्या १०० फुटी तिरंगा ध्वजाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने आज विविध शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनी, होमगार्ड पथक, विविध सामाजिक संघटना, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या सहभागाने तब्बल ३६५ फूट लांब तिरंगा ध्वजाची रॅली काढण्यात आली या रॅलीची सुरुवात मिरज हायस्कुल येथून झाली ती मिरज मार्केट येथून सराफ कट्टा मार्गे मिरज शहराच्या प्रमुख मार्गांवरून मार्गस्थ होऊन महात्मा गांधी चौक येथे संपन्न झाली जिथे सांगली जिल्ह्यातील पहिला १०० फुटी तिरंगा ध्वज उभारलेला आहे आणि १५ ऑगस्ट रोजी या ध्वजाचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे.
सध्या केंद्र सरकारच्या ‘मेरी मिट्टी मेरा देश’ चे अभियानही जोरदार सुरु आहे याच पार्श्वभूमीवर आजच्या रॅलीमुळे विद्यार्थ्यांमध्ये आपल्या देशाबद्दल नवचैतन्य निर्माण होईल अशी अशा नगरसेवक निरंजन आवटी यांनी व्यक्त केली तर आजच्या रॅली मुळे मिरजेच्या नावलौकिकात आणखीन भर पडेल असा विश्वास सौ. खाडे यांनी व्यक्त केला त्या या रॅलीच्या उदघाटन प्रसंगी बोलत होत्या.
आज निघालेल्या या रॅलीचे उदघाटन पालकमंत्री डॉ सुरेश खाडे यांच्या पत्नी सौ सुमन खाडे यांनी केले यावेळी माजी स्थायी समिती सभापती आणि नगरसेवक निरंजन आवटी, भाजप नेते सुरेश बापू आवटी, नगरसेवक संदीप आवटी, सुशांत खाडे, मिरज शहर पोलीस निरीक्षक संजीव झाडे, मिरज शहर वाहतूक पोलीस निरीक्षक भगवान पालवे, जेष्ठ धन्वंतरी डॉ विनोद परमशेट्टी, नगरसेवक आनंद देवमाने, शिवाजी दुर्वे, उद्योजक गजेंद्र कुल्लोळी, महम्मद मणेर, भाजप युवा मोर्चाचे जयगोंड कोरे, मिरज शहर भाजप अध्यक्ष बाबासाहेब आळतेकर, उमेश हर्गे, मिरज सुधार समिती चे ऍड अल्लाबक्ष काझी, गीतांजली पाटील, जाहीर मुजावर भाजप जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे, सामाजिक कार्यकर्ते अजित दोरकर प्रा रवींद्र फडके आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.