सोलापूर : शासनाने शाळा सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर तब्बल अठरा महिन्यानंतर आज शाळेची घंटा वाजली. शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे स्वतः दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी येथील एस.व्ही.सी.एस हायस्कूल येथे उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले यावेळी शिक्षणाधिकारी माध्यमिक भास्करराव बाबर, गटविकास अधिकारी पंचायत समिती दक्षिण सोलापूर राहुल देसाई, गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे, शाळेचे मुख्याध्यापक कौलगी व शिक्षक वृंद उपस्थित होते.
यावेळी शाळेच्या आवारात मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सीईओ स्वामी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. यावेळी सीईओ स्वामी यांनी वर्गात जाऊन कोविड विषयक घ्यावयाच्या काळजी बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना आनंद झाला होता आणि तो त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसत होता. सीईओ स्वामी यांनी विचारलेल्या प्रश्नांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे उत्तरे दिली. यावेळी शाळेच्या वतीने कोविड संदर्भात कोणकोणती काळजी घेण्यात येत आहे याचा सीईओ स्वामी यांनी आढावा घेतला व समाधान व्यक्त केले. यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होटगी व उत्तर सोलापूर तालुक्यातील मजरेवाडी शाळेसही स्वामी यांनी भेटी देऊन आढावा घेतला. यावेळी होटगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
मुख्याध्यापक हत्याळीकर. उपशिक्षक पतंगे, सय्यद, ठाकूर, उपशिक्षिका कुलकर्णी,ढंगे, वनस्कर, जगताप. मजरेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापिका उषा सुरवसे, पदवीधर शिक्षक शकीला इनामदार, प्रकाश राज शेट्टी, उपशिक्षक पद्मा पाटील, अप्पाशा उंबराणी, ललिता राठोड, बसवराज निम्बर्गी, सिराज नदाफ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भैरप्पा कुरे, केंद्रप्रमुख सी.रा. वाघमारे, शिक्षण विस्तार अधिकारी स्वाती स्वामी आदी उपस्थित होते.