सोलापूर दि.१५:- राज्य शासनाने वाहनाच्या फिटनेस सर्टिफिकेट घेण्यास विलंब झाल्यास प्रतिदिन ५० रुपये दंडाची आकारणी २१ मे २०२४ पासून सुरु केली. तेंव्हापासून लाल बावटा रिक्षा चालक संघटनेच्या वतीने अध्यक्ष कॉ.आडम मास्तर, सरचिटणीस कॉ. सलीम मुल्ला यांनी रिक्षा चालकांच्या वतीने शासनास निवेदने सादर केले. दरम्यानच्या काळात रिक्षा चालक संघटना संयुक्त कृती समिती सोलापूरची स्थापना करण्यास पुढाकार घेऊन कृती समितीच्यावतीने रिक्षा चालकांचे मेळावे, मोर्चा, घेराव, आंदोलन आदी कार्यक्रम घेऊन या प्रश्नाला वाचा फोडली.

शासन स्तरावर मा.मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मा. विरोधी पक्षनेते यांना निवेदने सादर करून रिक्षा चालकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नी लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी लावून धरली. सदर प्रश्नाबाबत मा. मुख्यमंत्री यांना घेराव घालण्याचा इशारा दिला. या घेराव कार्यक्रमासाठी शांती चौक पाणीटाकी येथील रिक्षा चालकांनी स्वतः ची रिक्षा स्वखर्चाने घेऊन पंढरपूर जाण्यासंबंधी संमती दिली. तद्पुर्वी जन भावनेचा आदर करत मा. शासनाने वाहनावरील फिटनेसच्या विलंब शुल्कास स्थगिती दिल्याचे विधान सभेत जाहीर केले व तसे आदेश संबंधित परिवहन विभाग दिल्याने सदरचा विलंब शुल्क माफ करण्यात आला आहे.
या आंदोलनात शांती चौक रिक्षा — हे सातत्याने सहभागी असल्याने सदर आंदोलनासाठी केलेल्या प्रयत्नाची माहिती असल्याने आज दि. १५ जुलै २०२४ रोजी रिक्षा चालकांच्यावतीने रिक्षा चालक कृती समितीचे नेते कॉ. आडम मास्तर व कॉ. सलीम मुल्ला यांचा सत्कार चे प्रमुख अनिल मोरे, रफिक पिरजादे, कमलाकर वाघमारे दत्ता कांबळे बिलाल जमादार मल्लीनाथ बिराजदार विनोद फुले रवि वाघमारे पप्पु सुर्वे शोएब शेख राहुलपारधे आदींनी केले.