सोलापुरातील खंडक बागेत दररोज बॅडमिंटन खेळणाऱ्या ग्रुपने सगळ्यांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. बॅडमिंटन खेळण्यासाठी ग्राउंडची साफसफाई स्वच्छता दररोज केली जाते. हा कौतुकाचा विषय असताना दररोज खेळणाऱ्या एका सदस्या च्या डोळ्याचे 13 जुलै रोजी मोतीबिंदूचे यशस्वी ऑपरेशन झाले म्हणून खंदक बागेतच असलेल्या बॅडमिंटन ग्राउंड च्या शेजारी 13 झाडे लावून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. सुमारे आठ ते दहा फूट उंच असलेली कोनो कार्पस अर्थात दुबई ट्री ही वेगाने वाढणारी झाडे लावण्यात आली आहे
लिमये वाडी मध्ये राहणारे वसंतराव जाधव हे दररोज पहाटे येऊन बॅडमिंटन ग्राउंड ची साफसफाई करतात तसेच योगा आणि प्राणायाम करतात. त्यांच्या डोळ्यावर मेतूबिंदूची शस्त्रक्रिया 13 जुलै रोजी पार पडली. याची आठवण म्हणून सर्व मित्रांनी 13 झाडे लावण्याचा संकल्प केला आणि आज सकाळी सर्वांनी मिळून 13 झाडे लावली. झाडांना खड्डे खोदणे, त्यांना काट्या बांधणे तसेच पाणी घालून हे वृक्षारोपण करण्यात आले शिवाय ही सर्व झाडे जगवण्याची जबाबदारी या ग्रुपने घेतली आहे. या वृक्षारोपण मोहिमेमध्ये वसंतराव जाधव यांच्यासह योगेश गाडेकर, दादू रोडगे शंकरराव खंडागळे, यशवंत सादूल, शिवाजी सुरवसे ,संतोष पाटील हुमनाबादकर, मूफीज अहमद महागामी, निजाम कुरेशी, सुनील धरणे, सुरेश दायमा, बिलाल पटवेकर, डॉक्टर गोळाप्पा घोळ हे तेरा जण सहभागी झाले होते. या मोहिमेचे खंदक बागेतील सदस्यांनी कौतुक केले