नवी दिल्ली : भारतात वेगाने डिजिटल होत आहे. परंतु, डिजिटल होताच काही सायबर फ्रॉड सुद्धा होत आहेत. सायबर फ्रॉडला सर्वात जास्त फेक सिम कार्डने केले जात आहे. फेक सिम कार्ड वरून फ्रॉड रोखण्यासाठी केंद्र सरकारने पाऊल उचलले आहे. यासाठी सरकार नवीन गाइडलाइन आणत आहे. या गाडइलाइन अंतर्गत सरकार एका आयडीवर फक्त ४ सिम कार्ड देण्याची योजना बनवत आहे. आतापर्यंत एका आयडीवर ९ सिम कार्ड दिले जात होते. परंतु, आता सरकार एका आयडीवर दिल्या जाणाऱ्या सिम कार्डची संख्या कमी करणार आहे.
याआधी नवीन सिम कार्डच्या संख्येत झाली होती कपात
रिपोर्टच्या माहितीनुसार, दूरसंचार विभागकडून एका आयडीवर सिम कार्ड वर मिळणाऱ्या सिम कार्डच्या संख्येत कमी करण्यात येणार आहे. याप्रकरणी दूरसंचारकडून या आठवड्यात कोणताही निर्णय घेतला जाऊ शकतो. हे काही पहिलेच असे होत नाही. ज्यावेळी सरकारकडून सिम कार्डच्या संख्येत कपात करण्यात आली आहे. याआधीही सरकारने २०२१ मध्ये सिम कार्डची संख्या कमी करून ९ केली होती.
फेक सिम कार्डची माहिती करणार
जर तुम्हाला माहिती करायचे असेल की, तुमच्या सिम कार्डवर जास्तीत जास्त किती सिम कार्ड जारी करण्यात आले आहे. तर तुम्हाला https://tafcop.dgtelecom.gov.in वर जावे लागेल. याआधी असा नियम होता की, तुमच्या आयडी कार्डवर कोणतेही फेक सिम कार्ड रजिस्टर्ड आहे. तर त्याची तक्रार केली जावू शकत होती. यानंतर त्या फेक सिम कार्डला ब्लॉक केले जात होते.