निवडणुकीच्या खर्चाला ऑडिट नसते. शिवाय या खर्चाला कोणीही विचारणारा नसतो, म्हणून मनमानी पद्धतीने अधिकारी निवडणुकीत खर्च करतात. होऊ दे खर्च.. निवडणुकीचे आहे वर्ष…असं म्हणत सोलापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी देखील कोट्यावधी रुपयांचा खर्च महापालिका निवडणुकीसाठी केला . बोटाला लावण्याच्या शाईपासून ते जेवणावळी आणि मंडप टाकण्यापर्यंत..शिवाय मतदान केंद्रावर विविध सोयी सुविधा करण्यासाठी मोठा खर्च केला जातो. या निवडणुकीसाठी सात निवडणूक निर्णय अधिकारी होते. आणि सात विविध ठिकाणी मतमोजणी करण्यात आली. 2017 रोजी झालेल्या मंडपाची बिल सव्वा कोटीच्या आसपास होते. मात्र नुकत्याच पार पडलेल्या यंदाच्या निवडणुकीत मंडपाचे हे बिल तब्बल पाच कोटी वर पोचले आहे. त्यामुळे एवढे मोठे बिल पाहून यात नवीन मंडप आला असता असे म्हणत महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी देखील डोळे वठारले आहेत. महापालिकेच्या बऱ्याच अधिकाऱ्यांनी लाखो रुपयाचा मलिदा या निवडणुकीच्या माध्यमातून खाल्ला आहे. त्यामुळे आयुक्तांनी जनहितार्थ आणि पारदर्शक कामकाजाचा नमुना दाखवण्यासाठी या सर्व खर्चाचा तपशील जाहीर करावा अशी मागणी होऊ लागली आहे.

