अकलूज : National Integrated Medical Association निमाच्या राज्यस्तरीय वार्षिक सर्वसाधारण सभेत निमा सोलापूर शाखेला “बेस्ट ब्रांच अवॉर्ड 2025-26” देऊन गौरविण्यात आले. सोलापूर शाखेने वर्षभर राबविलेल्या विविध सामाजिक, आरोग्यविषयक व स्पोर्ट उपक्रमांची दखल घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. या सभेचे उद्घाटन आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
निमा सोलापूर शाखेकडून राबविण्यात आलेल्या “संवेदना 2.0 रक्तदान मोहीम” या उपक्रमाला “बेस्ट अॅक्टिव्हिटी ऑफ द इयर” म्हणून घोषित करण्यात आले. तसेच निमा वुमन फोरम, सोलापूर यांच्या विविध नाविण्यपूर्ण उपक्रमांची दखल घेऊन त्यांना राज्यपातळीवरील द्वितीय क्रमांक देण्यात आला. याचबरोबर निमा स्टुडंट फोरम, सोलापूर यांनाही राज्यस्तरीय “बेस्ट ब्रांच अवॉर्ड” प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. यावेळी केंद्रीय शाखेचे अध्यक्ष डॉ.आशुतोष कुलकर्णी, तसेच डॉ. विनायक टेंभुर्णीकर डॉ. साहेबराव गायकवाड,डॉ. साधना कुलकर्णी आणि राज्य शाखेचे अध्यक्ष डॉक्टर ताटेवार, डॉ. देशमुख, डॉ. खर्चे आदी उपस्थित होते.
सदर सभेमध्ये राज्यभरातील इंटिग्रेटेड डॉक्टरांची माहिती संकलित करून प्रकाशित केलेल्या “निमा डायरी” या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमासाठी डॉ.विनायक टेंभुर्णीकर यांना व निमा सोलापूर शाखेला “Gratitude Award” देण्यात आला. तसेच “मेंबरशिप ड्राईव्ह स्पर्धा” मध्येही निमा सोलापूर शाखेने चालू वर्षी राज्यात अव्वल स्थान प्राप्त केले आहे.
या यशाबद्दल निमा सोलापूर शाखेचे अध्यक्ष डॉ. नागनाथ जिड्डीमनी, सचिव डॉ. अभिजीत पुजारी व कोषाध्यक्ष डॉ. प्रवीण ननवरे यांनी सर्व निमा राज्य शाखेचे सर्व पदाधिकारी, ज्येष्ठ मार्गदर्शक, सदस्य व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले .
अकलूज येथे पार पडलेल्या निमा राज्यस्तरीय सभेत सन्मान स्वीकारताना निमा सोलापूर शाखेचे पदाधिकारी. डॉ. विनायक टेंभुर्णीकर ,डॉ. साहेबराव गायकवाड, डॉ.रविराज गायकवाड, डॉ.नागनाथ जिड्डीमनी, डॉ अभिजीत पुजारी ,डॉ.प्रवीण ननवरे , डॉ.धनंजय कुलकर्णी ,डॉ. योगेश उडगीकर ,डॉ.आमिर कोटनाळ, डॉ.श्रुती मराठे ,डॉ.पल्लवी भांगे ,डॉ.अश्विनी देगावकर, डॉ.राजश्री मठ.

