मुंबई: लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला मोठा धक्का बसला असून आमदार निलेश लंके हे लवकरच शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात आता भाजपच्या सुजय विखे यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुजय विखे पाटील अशी लढत होणार हे नक्की झालंय.
निलेश लंके हे पारनेरचे आमदार असून अजित पवारांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती. दक्षिण अहमदनगरमधून ते लोकसभेसाठी इच्छुक होते. पण अजित पवार गटाला तीन ते चारच जागा मिळण्याच्या चर्चेमुळे त्यांची चांगलीच अडचण झाली होती. आता शरद पवारांची साथ दिल्यानंतर ते लोकसभेचे उमेदवार असतील अशी चर्चा आहे.
लोकनेते लवकर निर्णय घ्या, अमोल कोल्हेंची साद
लोकनेते लवकर निर्णय घ्या, दक्षिण नगरमध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ‘तुतारी’ वाजवा अशी साद काहीच दिवसांपूर्वी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी निलेश लंके यांना घातली होती. कोल्हेंच्या त्या आवाहनाला आता निलेश लंके यांनी प्रतिसाद दिला आहे.