NIA ची ११ राज्यांत मध्यरात्रीपासून छापेमारी सुरू

0
132

येस न्युज नेटवर्क : राष्ट्रीय तपास संस्थेने ने गुरुवारी पहाटे 3.30 वाजेपासून 10 राज्यांमधील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले, जे आतापर्यंत सुरू आहेत. टेरर फंडिंग प्रकरणात या कारवाईत उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, आसाम, महाराष्ट्र, बिहार, मध्य प्रदेश, पुद्दुचेरी, राजस्थानमध्ये संघटनेशी संबंधित 100 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार NIAचे सुमारे 200 अधिकारी हे छापे घालत आहेत.

छाप्यांच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरले PFIचे कार्यकर्ते
NIA, ईडी आणि राज्य पोलिसांच्या या छाप्याविरोधात PFI कार्यकर्ते निदर्शने करत आहेत. केरळमधील मल्लापुरम, तामिळनाडूतील चेन्नई, कर्नाटकातील मंगळुरूसह अनेक ठिकाणी संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. आवाज दाबण्यासाठी ही कारवाई करण्यात येत असल्याचे PFIने निवेदन जारी केले आहे. केंद्रीय यंत्रणा आम्हाला त्रास देत आहे.