भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वनडे सामना आज रायपूर येथे खेळवला जात आहे. या सामन्यात विजय मिळवत भारतीय संघ ही मालिका आपल्या नावे करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. भारताने पहिला वनडे समान जिंकत या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे.
३२ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर वॉशिंग्टनने न्यूझीलंडच्या संघाला आठवा धक्का दिला आहे. त्याने मैदानावर आपल्याला सेट झालेल्या फिलिप्सला बाद संघाला यश मिळवून दिले आहे. फिलिप्सने ५२ चेंडूत ५ चौकार मारत ३६ धावा केल्या.हार्दिक पांड्याने ३१ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सॅन्टनरला क्लीन बोल्ड केले.
सॅन्टनरनें ३९ चेंडूत ३ चौकार मारत २७ धावा केल्या. १९ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मोहम्मद शमीने ब्रेसवेलला ईशान किशनकडून झेलबाद केले. सुरुवातीच्या २ चेंडूवर ब्रेसवेलने चौकार मारले होते पण तिसऱ्या चेंडूवर त्याला तंबूत धाडले. शार्दूल ठाकूरने गोलंदाजीला येताच विकेट मिळवून दिली. त्याने ११ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर किवी संघाचा कर्णधार टॉम लॅथम याला १ धावेवर झेलबाद केले.
दहाव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर हार्दिक पांड्याने भारताला चौथी विकेट मिळवून दिली. त्याने कॉन्वेला ७ धावांवर शानदार झेलबाद केले .
शमीची शानदार गोलंदाजी सुरूच आहे. शमीने सातव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मिचेलला बोल्ड आणि झेलबाद केले. सहाव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर सिराजच्या निकोल्सला २ धावांवर गिलकडून झेलबाद केले आणि आजच्या सामन्यात आपली पहिली विकेट मिळवली.
दुसऱ्या वनडे सामन्याला सुरुवात झाली असून न्यूझीलंडची सलामी जोडी मैदानात आली आहे. भारताकडून प्रथम शमी गोलंदाजी करत आहे.