एमआयटीतर्फे जूनमध्ये मुंबईत राष्ट्रीय विधायक संमेलन

0
15

सोलापूर – पुण्याच्या एमआयटी संस्थेच्या स्कूल ऑफ गव्हर्नमेंट विभागातर्फे येत्या १५ ते १७ जून या कालावधीत मुंबईत राष्ट्रीय विधायक संमेलन आयोजित करण्यात आले आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हे संमेलन भरवण्यात येत असून त्यात देशातल्या सर्व विधिमंडळातील आमदारांना निमंत्रित करण्यात येणार आहे. अशा प्रकारचे हे देशातले पहिलेच संमेलन असल्याचे सरपंच परिषदेचे अध्यक्ष योगेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेस श्रीकांत येलेगावकर, कुमार करजगी,अरविंद जोशी उपस्तीत होते.