सोलापूर: नेहरूनगर येथील जागृती विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत नागपंचमी सणानिमित्त प्रशालेत प्राचार्य विजयरत्न चव्हाण व कांचन चव्हाण यांच्या शुभहस्ते सर्वप्रथम वारूळ व नागदेवताची पुष्पहार अर्पण करून विधी वर पूजा करण्यात आले.त्यानंतर प्रशालेतील इयत्ता पाचवी ते बारावीच्या वर्गात शिकत असलेल्या सर्व विद्यार्थिनींनी पारंपारिक साडी परिधान करून व अलंकार भूषणाने नटून-थटून वारूळ व नाग देवता भोवती नृत्य करून नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली.
या नागपंचमीच्या सामुदायिक नृत्यासाठी प्रशालेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख नलिनी राठोड मॅडम जेष्ठ शिक्षिका कांचन मॅडम यास्मिन शेख यांनी विद्यार्थ्यांना नृत्या विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेची क्रीडा शिक्षक श्री संतोष जाधव सर चित्रकला शिक्षक हालोळी एस जी , अविनाश कुंभार यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे पर्यवेक्षक ,एम एल म्हमाणे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.