माघवारी पालखी सोहळा 2025 नियोजन बैठक श्री विठ्ठल मंदिर चौपाड, सोलापूर येथे ह भ प नामदेव पुलगम यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली. या बैठकीमध्ये सोलापूर शहर व जिल्ह्यातील दिंडी प्रमुख उपस्थित होते. संपूर्ण सोहळा नियोजन मार्गदर्शन ह भ प सुधाकर इंगळे यांनी केले. अखिल भाविक वारकरी मंडळ पदाधिकारी व दिंडी प्रमुखांनी वारीतील अडचणी मांडल्या व त्या संबंधी शासनाला पत्र देऊन पालखी सोहळा व्यवस्थित करणेसाठी चर्चा करणेत आली. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, पोलीस संरक्षण, इ. विषयावर मत मंडण्यात आले.
दि. 3 फेब्रुवारी 2025 रोजी दु. 3.00 वा. श्री मार्कंडेय मंदिर, पंच कट्टा, सोलापूर येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी व संत तुकाराम महाराज पालखी पूजन करुन पद्मशाली ज्ञाती संस्था कडून अश्व पूजन करून दिंडी प्रमुखांचा सन्मान करण्यात येणार आहे. दु. 4.30 वा. नॉर्थकोट प्रशाला, सोलापूर येथे भव्य दिव्य गोल रिंगण केले जाणार असून या रिंगण सोहळ्यासाठी माऊलींचे अश्व येणार आहेत. अश्व चोपदार व मान्यवरांचे स्वागत सत्कार करून रिंगण सोहळा सुरु केला जाईल. जास्तीत जास्त वारकरी उपस्थित राहावे असे नियोजन केले जाणार आहे. श्री महादेव मंदिर साठे चाळ, सोलापूर येथे प्रस्थान समारोप केला जाणार आहे. आनंद दादा चंदनशिवे यांचे कडून उपस्थित वारकरी भाविकांचे स्वागत करून आरती केली जाणार आहे.
दि. 4 फेब्रुवारी रोजी स. 8.00 वा. पालखी मार्गस्थ होईल. दि. 5 फेब्रुवारी रोजी स. 9.00 वा. पाटकर वस्ती कुरुल ता. मोहोळ येथे दुसरे गोल रिंगण केले जाणार आहे. दि. 6 फेब्रुवारी रोजी स. 9.00 वा.महात्मा गांधी विद्यालय पेनूर ता. मोहोळ येथे तिसरे गोल रिंगण व दु. 4.30 वा. दत्त प्रशाला, सुस्ते ता. पंढरपूर येथे चौथे गोल रिंगण केले जाणार आहे. दि. 7 फेब्रुवारी रोजी स. 9.00 वा. जलाराम मठ, पंढरपूर समोर उभे रिंगण केले जाणार आहे. नंतर आपापल्या पारंपरिक ठिकाणी सर्व दिंड्या जातील.
पालखी सोहळा व रिंगण सोहळा व्यवस्थित संपन्न करणेसाठी दरवर्षी प्रमाणे चिट्ठीद्वारे समिती निवड करणेत आली. माघवारी पालखी सोहळा 2025 अध्यक्षपदी ह भ प नागनाथ शिंदे (हरळय्या समाज दिंडी ), उपाध्यक्ष ह भ प महेश जाधव (कैकाडी समाज दिंडी ), सचिव ह भ प दगडू डोंगरे (संतसेवा मंडळ ), संपर्क प्रमुख ह भ प प्रदीप मोरे महाराज, खजिनदार ह भ प नामदेव बाचल इ. पदाधिकारी निवड करण्यात आली.या वेळी जोतिराम चांगभले (प्रदेश अध्यक्ष ), किसन कापसे (प्रदेश उपाध्यक्ष ), संजय पवार (शहर अध्यक्ष ), नागनाथ पाटीलया सर्वांनी मनोगत व्यक्त केले.
नवं नियुक्त सर्व पदाधिकारी सन्मानीत करून पसायदानाने बैठक समारोप केला. या बैठकीसाठी बळीराम जांभळे (राष्ट्रीय सचिव ) मोहन शेळके (प्रदेश सचिव ), बंडोपन्त कुलकर्णी (जिल्हा अध्यक्ष ), किरण श्रीचिप्पा (सह अध्यक्ष ) वामन लोंढे, दर्शन ढगे, विष्णूपंत मोरे महाराज, इ. महिला व पुरुष पदाधिकारी उपस्थित होते.