मंगळागौरीला यंदा ऑपरेशन सिंदूर थीम; पाणी, रस्ते विकासावरही टाकला प्रकाश
सोलापूर- श्रावण महिन्यातील दर मंगळवारी मंगळागौरीच्या पूजनातून संस्कृतीआणि परंपरेचे जतन केले जाते. येथील नाच ग घुमा ग्रुपच्या वतीने कार्यक्रम झाला. या वेळी महिलांनी आकर्षक वेशभूषा करून पंचवीस प्रकारच्या फुगड्या खेळल्या. आगोटा पागोटा, तिखटमीठ मसाला अशा प्रकारचेखेळ नृत्यातून सादर केले. या वेळी फोडणीचे पोहे कशाला… पारंपारिकगाण्याला, मोठे रस्ते कशाला वाहतूक कोंडी सोडवायला.. समांतर जलवाहिनी कशाला सगळ्यांना समप्रमाणात पाणी मिळायला, अशा शहरातील मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला. मोबाइल, व्यसन, संस्कारक्षम पिढी घडण्याचे संदेशही खेळांतून देण्यात आले.


परंपरा आणिअाधुनिकतेची सांगड घालत सादरहाेणाऱ्या मंगळागाैरीतून आरोग्य संवर्धनाचा संदेश दिला जात आहे. मंगळागौरीच्या खेळांसाठी शहरात १० हुन अधिक ग्रुपअसून एक ते दीड महिन्यापूर्वीच विविधकार्यक्रमांसाठी त्यांचे बुुकिंग करण्यातअाली अाहे.
लहान मुलांसाठी मोर, ससा,कोंबडा, घोडा असे प्राणी खेळांच्यामाध्यमातून दाखवले जात आहे. यंदा मोर,होडी, पाणी लाटा, तिखट मीठ मसाला, ताक, धुणे, पिंगा, अागोटा पागोटा, गोफ असे विविध प्रकारचे खेळ आकर्षणाचेकेंद्र ठरले आहेत. श्रावणात दर मंगळवारी नवविवाहित महिला सौभाग्य वृद्धीसाठी मंगळागौरीची पूजा करतात. त्यात सासू-सुनेच्या नात्यातील रुसवा, नणंद-भावजय यांचा खट्याळपणा असे नात्यातील प्रेमखेळांद्वारे उलगडले जाते. शहरातील १० ग्रुप एक ते दीड तासात ४० ते ५० प्रकारचे खेळ खेळतात. त्यात १५ ते १७ प्रकारच्याफुगड्या, सहा ते सात प्रकारचे झिम्मे खेळले जातात, असे स्मिता कुलकर्णी यांनी सांगितले.

..या वस्तूंचा वापर
स्वयंपाक घरात वापरलेजाणारे लाटणे, तवा, नारळाची करवंटी, सूप अशा विविध वस्तू वापरून मंगळागाैरीचे खेळ खेळले जातात.महिला मंगळागाैरीसाठी खास नऊवार साडी ही खरेदी करतात.
१५ वर्षांपासून ग्रुप
‘नाच ग घुमा” हाआमचा ग्रुप १५ वर्षांपासून आहे. झिम्मा,वेगवेगळ्या फुगड्या, गाठोडं, होडीअसे अनेक पारंपरिक खेळ , गाणी असतात. आरोग्य जागृती, महिला विषयक कायदे, स्त्री-पुरुष समानता यासह सामाजिक प्रश्नांवर या कार्यक्रमाद्वारे आम्ही प्रकाशझोत टाकत असतो.
- सरिता कुलकर्णी, समन्वयिका, नाच ग घुमा
स्त्री शक्तीचा जागर…
आमच्याग्रुपमध्ये मी गाणीम्हणते. आमचीसगळी गाणीपारंपरिक आहेत.त्यांना वेगवान लय आहे. त्यामुळे माझ्या मैत्रिणींनाही खेळ खेळण्यात उत्साह असतो. यावर्षी आम्ही ‘स्त्री शक्तीचा जागर’अंतर्गत बुद्धीबळ विश्वविजेती दिव्या देशमुख, मिशन सिंदूरच्या कमांडर व्योमिका सिंग, कर्नल सोफिया कुरेशी, अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्या ‘कर्तृ्त्वाची गाथा’मंगळागौरच्या खेळाद्वारे सर्वांपुढे मांडली.
- केतकी कामतकर,
आधुनिकता आणण्याचा प्रयत्न
मंगळागौरीची पूजा,खेळ पारंपरिक असतात. आम्ही त्यातआधुनिकताहीआणण्याचा प्रयत्नकेला आहे. जुने-नवीनखेळ आणि गाणी याची सांगडघालण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.
- प्रज्ञा ठोंबरे
मंगळागौरीचे विशेष महत्त्व आहे ते खेळांमुळे.
आम्ही या खेळांत १० ते १२ प्रकारच्या फुगड्या, ८ ते १० प्रकारचे झिम्मे, लाटणे, सूप, तवा, गोफ, गाठोडे असे७५ ते ८० प्रकारचे खेळ खेळतो. त्यातून शरीराला व्यायाम मिळतो, ताजेतवाने वाटते.
- कांचन डोके