प्रिसिजन वाचन अभियानात रूळापलिकडचं जग वाचकांना उलगडून दाखविले
सोलापूर, ता. – रेल्वे चालवत असताना वाचनातून मी संर्दभ शोधत गेलो. वाचनातून मी माझा उजेडाचा प्रवास सुरु आहे, असे ३० वर्ष रेल्वेचे ड्रॉयव्हर असणारे लेखक गणेश कुलकर्णी यांनी प्रिसिजन वाचन अभियानाचे पाचवे पान उलगडताना प्रिसिजन वाचन अभियानातील मुलाखती दरम्यान त्यांनी व्यक्त केले.
प्रारंभी माझा वाचनप्रवास या उपक्रमांतर्गत मानसी वैद्य यांनी आपला वाचन प्रवास या बद्दल मनोगत व्यक्त केले. गणेश मनोहर कुलकर्णी यांच्या “रूळानुबंध” या पुस्तकाचे अभिवाचन नाट्य कलाकार संदीप जाधव व युवा कवियत्री रसिका तुळजापूरकर यांनी केले. त्यानंतर मानसी वैद्य, संदिप जाधव, रसिका तुळजापूरकर यांचा सन्मान डॉ सुहासिनी शहा यांच्या हस्ते करण्यात आला.
अभिवाचनानंतर लेखक गणेश कुलकर्णी यांनी मुलाखती दरम्यान त्यांनी आपला रेल्वेसेवेतील भन्नाट, संवेदनशील असा प्रवास उलघडला. झाडांवरील प्रेम व्यक्त करतांना त्यांनी सांगितले कीं निसर्गाचा उपभोग पण सम्यकपणे घेतला पाहिजे. पुढे बोलताना त्यांनी या पुस्तकाच्या मुखपृष्ठाच्या चित्राचा किस्सा सांगितला.वाचनाची तहानच लोकांना लागत नाही हे दुर्दैव आहे.
वाचनाविषयी बोलताना त्यांनी सांगितले कि, आवड असेल तर सवड नक्की मिळते. त्याप्रमाणे ड्युटी संपल्यावर रेल्वेचा लोकोपायलट एक कोपरा विश्रांतीसाठी पकडायचा पण मी तो कोपरा वाचनासाठी पकडायचो. विश्रांती ही झोप घेऊन नाही तर पुस्तक वाचून मनला विश्रांती मिळते. लायब्ररीत काम करत करत पुस्तकाच्या प्रेमात पडलो.
रेल्वे चालवत असताना वाचनातून मी संर्दभ शोधत गेलो. वाचनातून मी माझा उजेडाचा प्रवास सुरु आहे. या सर्व प्रवसात पत्नीबद्दल बोलताना ते त्यांच्या मनातला हळवा कोपरा मोकळा केला. कोरोना काळात लेखन प्रवास ग्रीन सिग्नल मिळाला. सर्व जग निवांत असताना मी लेखनात व्यस्त झालो. सोलापूर बद्दल बोलताना त्यांनी लखनऊच्या नवाबची ‘बाबुल मेरा मेहेर छूटा’ ही शायरी म्हणून दाखविली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार माधव देशपांडे यांनी केले.