सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीचे नगारे जोरजोराने वाजू लागले आहेत. तिच्या सहा मार्च रोजी विद्यमान नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा कालावधी संपणार असून त्यानंतर महापालिकेवर प्रशासक लागणार आहे त्यामुळे नगरसेवकांनी आपापल्या नियोजीत प्रभागात जोरदार कामे सुरू केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दोन दिवस सोलापूर दौऱ्यावर येत आहेत .या निमित्ताने पुन्हा एकदा राष्ट्रवादी मधील गट बाजी उफाळून येत आहे. सोलापूर शहर राष्ट्रवादीमध्ये उदंड झाले नेते अशी अवस्था झाली आहे तर दररोज गटबाजी आणि भांडण तंटे यामुळे राष्ट्रवादीचे काय होणार याची उत्सुकता लागली आहे भाजपकडून मात्र मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतपणे नियोजन सुरू आहे शहर उत्तर मध्ये विजयकुमार देशमुख तर दक्षिण मध्ये आमदार सुभाष देशमुख यांनी तर संभाव्य उमेदवारांच्या याद्या देखील तयार केल्याचे सांगण्यात येते. काँग्रेसमध्ये आणि शिवसेनेमध्ये मात्र म्हणावा तितका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोर दिसून येत नाही. येत्या 3 मार्च रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे त्यानंतर प्रभागातील आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर या राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची निवडणुकीपूर्वी आघाडी होणे मुश्कील आहे असे दिसते तर निवडणुकीनंतर ही तीनही पक्ष सत्तास्थापनेसाठी एकत्र येतील अशी चिन्हे आहेत त्यामुळे सत्ता राखण्यासाठी भाजप किती आकडा गाठणार याची गणिते आतापासून मांडली जाते आहे त्यामुळे 113 नगरसेवक कांच्या सोलापूर महापालिकेमध्ये कोणत्या पक्षाचे किती पक्षीय बलाबल याचे अंदाज आतापासून बांधले जाऊ लागले आहेत.