सोलापूर : सोलापूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मार्च दोन हजार वीस पासून असल्यामुळे व लॉकडाऊन सुरू असल्याने लोकांचे आर्थिक उत्पन्न घटले आहे आणि याचा परिणाम म्हणून महानगरपालिकेच्या सुद्धा उत्पन्नात घट झालेली आहे.त्यामुळे महापालिकेचा मालमत्ता कर (टॅक्स) संकलनावर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने मालमत्ता कर थकबाकीदार यांच्यासाठी अभय योजना जारी करण्यात आली आहे. या योजनेमध्ये शहरातील कर थकबाकीदार ज्यांच्यावर शास्ती व नोटीस फी, वसुली चा खर्च लावण्यात आला आहे तो या योजनेअंतर्गत टप्प्याने माफ करण्यात आला आहे.
सोलापूर शहरातील नागरिकांना नोव्हेंबर महिन्यात मालमत्ता कर थकबाकी भरल्यास 80 टक्के शास्ती, तर डिसेंबर महिन्यात मालमत्ताकर थकबाकी भरल्यास 70 टक्के व जानेवारी महिन्यात 60 टक्के मालमत्ताकर थकबाकी भरल्यास फेब्रुवारी मध्ये 50 टक्के आणि मार्च महिन्यात मालमत्ता कर थकबाकी भरल्यास 50 टक्के मालमत्ता करावरील शास्ती माफीची सवलत देण्यात आली होती.
पण गेल्या 15 दिवसांपासून सायबरटेक कंपनीने मालमत्ता कर विभागाची सर्व्हर सेवा बंद केल्याने जानेवारी महिन्याच्या 60 टक्के शास्ती माफीचा फायदा नागरिकांना घेता आला नाही. त्यामुळे 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत मुदत देऊन 60 टक्के शास्ती माफ करण्यात येणार आहे.
तरी सोलापूर शहरातील सर्व नागरिकांनी ज्यांचे मालमत्ता कर थकीत आहेत त्यांनी मालमत्ता कर भरून या योजनेचा लाभ घ्यावा.