मुंबई ते बंगळूर दरम्यान धावणाऱ्या सुपरफास्ट वंदे भारत स्लीपर एक्सप्रेसला रेल्वेमंत्री Ashwini Vaishnaw यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे. मात्र ही ट्रेन नेमकी कोणत्या मार्गाने धावणार याबाबत अजूनही स्पष्टता नाही.
सध्या दोन मार्गांवर चर्चा सुरू आहे –
👉 मुंबई – पुणे – सोलापूर – वाडी
👉 मुंबई – पुणे – मिरज – बेळगाव – हुबळी
या ट्रेनमुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, सध्या पुणे ते बंगळूर प्रवासाला सुमारे 18 तास लागतात, तोच प्रवास वंदे भारतमुळे अवघ्या 13 तासांत पूर्ण होणार आहे.
या अत्याधुनिक ट्रेनमध्ये एकूण 16 डबे असतील –
🔹 11 एसी थ्री टियर
🔹 4 एसी टू टियर
🔹 1 एसी फर्स्ट क्लास
👉 एकूण प्रवासी क्षमता – 823
ही ट्रेन आठवड्यातून 6 दिवस धावणार असून, मुंबई आणि बंगळूरहून रात्री सुमारे 9 वाजता एकाच वेळी सुटणार आहे. चाचणीदरम्यान 180 किमी प्रतितास वेग गाठला असला तरी प्रत्यक्ष धावण्याचा वेग 160 किमी प्रतितास असेल.
दरम्यान, सोलापूर मार्गे ट्रेन धावावी यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी मागणी केल्यास त्याला यश मिळण्याची शक्यता असल्याचे संकेत आहेत. सोलापूर विभागीय रेल्वे कार्यालयाकडे अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.

