सोलापूर : सिंहगड इन्स्टिटयूट केगाव व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ’रेशीम धागा तंत्रज्ञान व संबंधित उद्योग व्यवसाय’ या विषयावर मल्टी मेगा इव्हेंट चे आयोजन करण्यात आले आहे.
याअंतर्गत आंतरराष्ट्रीय परिषद, शेतकरी मार्गदर्शन मेळावा, रेशीम तंत्रज्ञानावर आधारीत विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा , विज्ञान प्रदर्शन, विद्यार्थी आणि वैज्ञानिक संवाद, विज्ञान व प्रकल्प प्रदर्शन, रेशीम उद्योगाला पूरक व्यवसाय प्रदर्शन या विविध कार्यक्रमांचे आयोजन दिनांक 16 ते 18 फेब्रुवारी दरम्यान सिंहगड इन्स्टिट्यूट कॅम्पस केगाव येथे होणार आहे. तरी सर्व शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक, प्रयोगशील शेतकरी व उद्योजक यांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन सिंहगड महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
रेशीम उद्योग हा उत्कृष्ट शेतीपूरक व्यवसाय होऊ शकतो व शेतकर्यांची आर्थिक प्रगती त्याद्वारे सुधारली जाऊ शकते. पण त्यासाठी आवश्यक शास्त्रशुद्ध माहिती घेणे आवश्यक आहे. ही माहिती देण्याच्या अनुषंगाने येत्या 17 फेब्रुवारी रोजीे सिंहगड इन्स्टिट्यूट येथे ’रेशीम उद्योगाचा प्रभावी वापर’ या विषयावर शेतकरी मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात देशभरातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधक शेतकर्यांना मार्गदर्शन करणार आहेत तसेच रेशीम व्यवसायाशी निगडित वस्तू व तंत्रज्ञानाचे प्रदर्शन देखील या वेळी आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा कार्यक्रम 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता सिंहगड इन्स्टिटयूट सोलापूर, येथे आयोजित केला आहे. तरी प्रयोगशील, प्रगतशील शेतकरी बंधूनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सिंहगड इन्स्टिट्यूट च्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी डॉ. पी. पी. तपकीरे 9767890517,प्रा. एम. टी. शिंदे 7057833111 यांच्यासंपर्क साधावे.
शेतकरी मेळाव्या व्याख्यान,यशोगाथा, शोधनिबंध सादरीकरण
या शेतकरी मेळाव्यात सकाळी सकाळी 9.30 ते 10 यावेळेत शेतकर्यांची नाव नोंदणी, 10 ते 10.45 वाजता डॉ.एस.बी. कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत उदघाटन होईल. डॉ.ए.डी. जाधव यांचे रेशीम शेती व मूल्यवर्धित उत्पादने व्याख्यान, रेशीम शेती रेशीम उद्योगाचे फायदे व वैशिष्टे यावर डॉ.एम.बी. ढवळे यांचे व्याख्यान, डॉ. विनीत पवार यांचे रेशीम शेती व शासकीय योजनेवर व्याख्यान, यशस्वी शेतकर्यांची यशोगाथा, डॉ. एन.बी. चौधरी यांचे रेशीम उद्योग आणि पर्यावरण प्रदुषणावर व्याख्यान, रेशीम संशोधन शोधनिबंध सादरीकरण असे कार्यशाळेचे वेळापत्रक राहणार आहे. सकाळी 9.30 ते 5 वाजेपर्यंत सत्र चालणार आहे.