१७ पिकांचा ‘एमएसपी’ वाढला!… शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा निर्णय

0
15

येस न्युज नेटवर्क : मोदी सरकारने देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. एकूण १७ पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाने आज (बुधवार) हा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने २०२२-२३ पीक वर्षासाठी पिकांचा एमएसपी १०० रुपयांनी वाढवून २,०४० रुपये प्रति क्विंटल केला आहे. त्याचप्रमाणे इतर अनेक खरीप पिकांवरही एमएसपी वाढवण्यात आला आहे.

तीळावर ५२३ रुपयांची वाढ झाली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “पेरणीच्या वेळी एमएसपीची माहिती घेतल्याने शेतकऱ्यांचे मनोबलही उंचावते आणि त्यांना पिकाला चांगला भाव मिळतो. यावेळी सर्व १४ खरीप पिके आणि त्यांच्या वाणांसह १७ पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्यात आली आहे.शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत.”