- एका बुलेटसह, दहा मोटारसायकल जप्त
- शहर पोलिस व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कामगिरी ३ लाख ४५ हजारचा मुद्देमाल जप्त
- पंढरपूर सह सातारा, सांगली, इंदापूर येथून चोरल्या होत्या मोटर सायकल
पंढरपूर : पंढरपूर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून शहराच्या विविध ठिकाणाहून नागरिकांच्या मोटर सायकल चोरीला जाण्याचे प्रकार वाढले होते याची दखल घेत पंढरपूर शहर पोलिस व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने गंभीर दखल घेत त्यांना येथील जुना पेठेत राहणारा आकाश फिरंगीनाथ बामणे हा आपल्या साथीदारांसह मोटरसायकल चोरी करत असल्याची माहिती मिळताचसदर पथकाने त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून बुलेट सह दहा मोटारसायकली जप्त करण्यात आले असल्याची माहिती आज उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली. यावेळी शहर पोलीस निरीक्षक अरुण पवार तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख नवनाथ गायकवाड सह पथक उपस्थित होते.