No Result
View All Result
- देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन विधान परिषदेच्या निवडणुकांबाबत संबोधित केलंय. बैठकीसाठी सर्व आमदार,खासदारांनी उपस्थित राहुन आगामी कार्यक्रम आणि विधान परिषदेच्या निवडणुकांबाबत चर्चा केलीय. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी पक्षातील लोकांना विधान परिषदेच्या निवडणुकांबाबत कोणत्या सूचना आणि निर्देश दिलेत आहेत. तसेच निवडणुकीसाठी भाजप-शिंदे गटाकडून कोणती रणनीती आखण्यात आलीय. यासंदर्भात माहिती अद्याप समोर आलेली नाही.
- दरम्यान, बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शिंदे-फडणवीस सरकारचे मंत्री शंभूराज देसाई, संजय राठोड, दादा भुसे, प्रताप सरनाईक आदी नेते उपस्थित होते. काल मुंबईतील विविध विकासकामांच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई दौरा केला. या दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान मोदींनी सभेला संबोधित करताना तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले.
- राज्यातील एकूण पाच मतदारसंघात विधानपरिषदेच्या निवडणुका पार पडणार असून यामध्ये कोकण, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, नागपूर मतदारसंघासाठी येत्या 30 जानेवारीला निवडणुका पार पडणार आहे. त्यापैकी चार जागांसाठी भाजपकडून उमेदवार देण्यात आले आहेत. भाजपकडून फक्त नाशिक पदवीधर मतदारसंघाबाबत अद्याप कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देण्यात आलेला नसून नाशिक पदवीधरसाठी भाजप कोणाला पाठिंबा देणार हे अद्याप अस्पष्टच आहे. तर दुसरीकडे औरंगाबाद मतदारसंघातून किरण काळे यांना उमदेवारी देण्यात आलीय. तसेच नागपूरमधून नागो गाणार यांना भाजपकडून पाठिंबा देण्यात आला आहे.
- त्याचप्रमाणे महाविकास आघाडीकडूनही विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी रणनीती आखण्यात आली असून नागपूरमध्ये सुधाकर अडबाले तर नाशिक पदवीधरमधून शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहिर करण्यात आला आहे. राज्यातील एकूण पाच जागांपैकी नाशिक आणि नागपूरच्या मतदारसंघाकडे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. दरम्यान, आगामी काळात विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षाचं वर्चस्व असणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
No Result
View All Result