येस न्युज नेटवर्क : जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचे उद्घाटन करण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देहू दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. लोकार्पणानंतर पंतप्रधानांनी केलेल्या भाषणामुळे उपस्थित वारकरी मंडळी मंत्रमुग्ध झाली. तसेच, त्यांनी यावेळी ११ हजार कोटींच्या रस्ता पालखी मार्गासाठी बांधणार असल्याची मोठी घोषणा यावेळी केली. त्यामुळे त्यांच्या या घोषणेचं उपस्थित लोकांना टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं.
श्री विठ्ठलाय नमः म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाची सुरुवात केली. तसेच, त्यांनी यावेळी ११ हजार कोटींच्या महामार्गाची घोषणा केली. ते म्हणाले की, पालखी मार्गातील २ राष्ट्रीय राजमार्गाचा चार पदरी करण्याची संधी मला मिळाली. श्री संत ज्ञानेश्वर पालखी मार्गाचा निर्माण ५ टप्पांत होईल. तर, तुकाराम महाराज पालखी मार्गाचा निर्माण तीन टप्प्यांत होईल. या सातही टप्प्यांतून ३५० किमीचा महामार्ग बनवण्यात येईल. यासाठी ११ हजार कोटींपेक्षा अधिक खर्च यामुळे क्षेत्रविकासाला गती मिळेल.