विजापूर नाका डीपी पथकाची कामगिरी
येस न्युज मराठी नेटवर्क : २ मे रोजी रात्री झालेली चोरी २४ तासाच्या आत ३ मे रोजी दुपारी बारा वाजता विजापूर नाका पोलिसांच्या डी . बी. पथकाने उघडकीस आणली आहे.दोन मे रोजी रात्री घराचा दरवाजा उघडा असल्याचे पाहून घरात घुसून मोबाईल व इतर ३७ हजार रुपयांचा माल चोरीस गेला होता. विजापूर रस्त्यावरील सोनिया नगर येथे राहणाऱ्या शरणकुमार कनकी यांनी या चोरीबाबत तक्रार दाखल केली होती.
तीन मे रोजी कोरोना हजाराच्या अनुषंगाने पेट्रोलिंग चालू असताना जुना विजापूर नाका चौकात एका संशयिताला पकडण्यात आले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता सॅमसंग कंपनीचा मोबाईल हँडसेट मिळून आला . हा मोबाईल चोरीमधील असल्याचे लक्षात आल्यानंतर चौकशीअंती त्याने गुन्ह्यातील चोरी केलेला टीव्ही मिक्सर, तांब्याचा हंडा, कलश , घागर असा सगळा ३७ हजारांचा माल पोलिसांना दिल्याचे सांगण्यात आले . लिमये वाडीतील मल्लू घोडके यांच्या पिठाच्या गिरणी जवळील राहणाऱ्याअमोल गायकवाड आणि त्याच्या मित्राने ही चोरी केली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार कोल्हार सहाय्यक फौजदार संजय मोरे यांच्या पथकाने या चोरीचा तपास लावला आहे.