अक्कलकोट : आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान दौऱ्यावर असताना मतदार संघातील अंकलगे येथे प्रचार बैठक घेतली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. नागरिकांनी कल्याणशेट्टी यांना विधानसभेच्या निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. अंकलगे गावातील लाडक्या बहिणींनी आनंदाने त्यांचे स्वागत केले आणि मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचे कौतुक केले. गावातील अनेक माता माऊलींना आणि लाडक्या बहिणींना या योजनेचा फायदा मिळाल्याने लोकप्रतिनिधी म्हणून मला समाधान वाटल्याचे यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी मारुती कोळी, महादेव उपासे, परमेश्वर यादवाड, डॉ. अशोक हिप्पर्गी, महादेव मुडवे, विठ्ठल विजापूरे, अबंण्णा विजापूरे, महनीगप्पा मेनगुडले, नागेश पट्टनशेट्टी, महादेव सुतार, मंत्रजात तोरणगी, महादेव विजापूर, शिवशरण विजापूर, रेवाप्पा पुजारी, खंडप्पा वग्गे, राघु याबाजी, बाबूषा कोरपे, गुरू मुडगी, शिवानंद मानशेट्टी, अजीज सुतार, राजकुमार झिंगाडे, राम हुक्केरीसह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.