विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज पुरवणी अर्थसंकल्पावरील झालेल्या चर्चेत सहभागी झालो. महसूल व वन विभाग,नगरविकास,जलसंपदा,उर्जा, ग्रामविकास,सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याशी संबंधित विविध मागण्या सादर केल्या.
कृष्णा-मराठवाडा प्रकल्पाअंतर्गत उजनीतुन मराठवाड्याला करमाळा तालुक्यातील जेऊर बोगद्यादवारे पाणी जात असताना बोगद्यावरील,कोंढेज, कुंभेज सरपडोह, खडकेवाडी, गुळसडी, शेलगाव, पांडे, अर्जुननगर आदि गावांना शाॅप्ट व उपसा सिंचन पद्धतीने पाणी देण्यासाठी करावयाच्या कामांना मंजुरी देऊन यासाठी लाक्षणिक तरतुद करणे गरजेचे आहे.
आष्टी उपसा सिंचन योजनेत मोहोळ तालुक्यातील अपूर्ण कामे तसेच समाविष्ट असलेल्या माढा तालुक्यातील मोडनिंब व बैरागवाडी गावांना सिंचनासाठी पाणी उपलब्द होण्यासाठी प्रस्तावित १२५ कोटी रुपयांच्या सुधारीत प्रशासकीय मान्यता देऊन त्यासाठी निधीची तरतुद करण्यात यावी.
उजनी धरण ते महाराष्ट्र कर्नाटक सीमेपर्यंत २४ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. महाराष्ट्र व कर्नाटक राज्याने बांधलेले ८ आंतरराज्यीय बंधारे सोडले तर उरलेले १६ बंधारे हे दगडी बांधकामामध्ये बांधलेले आहेत. त्यातुन पाण्याची गळती चालु आहे. बांधकाम जुने झालेले असल्याने बर्गे टाकणे व काढणे जिकरीचे होत आहे. सद्यस्थितीत या बंधाऱ्याच्या माध्यमातुन ३.८ tmc पाणीसाठा निर्माण झालेला आहे. त्या माध्यमातुन २४ हजार ४१० हे. सिंचन क्षेत्र निर्माण झाले आहे.परंतु या १६ को.प बंधाऱ्याचे बॅरेजेसमध्ये रुपांतर केल्यास १०.६४ tmc पर्यंत पाणीसाठा होणार आहे त्यामुळे सिंचनक्षमताही त्याच पटीत वाढणार आहे त्यादृष्टीने
१)भाटनिमगाव ता.इंदापुर, २)टणु ता इंदापुर, ३)शेवरे ता.माढा, ४)वाफेगाव ता.माळशिरस, ५)मिरे ता.माळशिरस, ६)जांभुड ता.माळशिरस, ७)पिराची कुरोली ता.पंढरपुर, ८)गुरसाळे ता.पंढरपुर, ९)को.प बंधारा पंढरपुर, १०)मुंढेवाडी ता.पंढरपुर, ११)पुळुज ता.पंढरपुर, १२)उचेठाण ता.मंगळवेढा, १३)बठाण ता.पंढरपुर, १४)अरळी ता.मंगळवेढा, १५)माचणुर ता.मंगळवेढा, १६)वडापुर ता.दक्षिण सोलापुर
या को.प बंधार्यांचे बॅरेजसमध्ये रुपांतर करण्यासाठी मंजुरी देण्यात यावी अशी मागणी केली.
महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाकडील पुणे, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, कोल्हापूर येथील ८५,६३६ एकर जमीनिपैकी ४१,२३१ एकर जमीन खंडकरी व त्यांच्या वारसांना वाटल होऊ. ४०, ८७४ एकर जमीन महामंडळाकडे शिल्लक राहत आहे. मूळ खंडकऱ्यांना जमिनी देताना भोगवटादार वर्ग २ म्हणून वाटप करण्यात आले. १० वर्षांनंतर या जमिनींचे वर्ग मध्ये रुपांतर होईल असे सांगण्यात आले होते. परंतु अद्यापही या जमिनी वर्ग झाम्या नाहीत याबाबत तातडीने नोंद करून तरतूद करण्यात यावी अशी विनंती केली.
कुसुम सौर पंप योजनेस सोलापूर जिल्ह्यातून प्रचंड मागणी आहे. यावर्षी २ लाख सौर कृषीपंप वाटपाचे उद्दिष्ट आहे सोलापूर जिल्ह्यास अधिकाधिक कुसुम सौरपंप उपलब्ध करून देण्यात यावे असेही बोलतांना सांगितले. राज्यातील ग्रामपंचायतींचा आकृतीबंध गावाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता अद्ययावत करून १० हजार लोकसंख्येच्या पुढं ग्रामपंचायतींमध्ये स्थापत्य अभियंता पदनिर्मिती करण्यात यावी.
सोलापूर जिल्ह्यातील गुरुनानक चौकात १०० खाटांचे महिला व बालरुग्णालय तसेच १०० खाटांचे जिल्हा रुग्णालय मनुष्यबळ आणि निधी अभावी गेले वर्षभर ही रुग्णालये धुळखात पडुन आहेत. या रुग्णालयांसाठी काही निधी व पदनिर्मिती गरजेची असून तशी तरतूद शासनाने करावी अशी मागणी केली.