सोलापूर : काँग्रेस अल्पसंख्याक विभाग युवक अध्यक्षपदी नजीब शेख यांची निवड झाली. आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते शेख यांना निवडीचे पत्र देण्यात आले. प्रजासत्ताक दिनानिमित्त काँग्रेस भवनात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नजीब शेख यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, शहर कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, मनोज यलगुलवार, माजी महापौर सुशीला आबुटे, माजी नगरसेवक तौफिक हत्तुरे, अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष जुबेर कुरेशी, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, शोएब महगामी, हारुण शेख, एजाज बागवान, अंबादास करगुळे, देवाभाऊ गायकवाड, भीमाशंकर टेकाळे आदी उपस्थित होते.