सोलापूर : राज्याच्या परिवहन मंत्रीपदी निवड झाल्यानंतर नामदार प्रतापशेठ सरनाईक यांचा सोलापूरचे सुर्या ग्रुपचे संस्थापक राजकुमार सुरवसे यांच्याकडून सत्कार करण्यात आला. यावेळी राजन चिंचोरे आणि सुरवसे मित्र परिवार उपस्थित होता.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदावर तसेच उपमुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे अजित पवार यांची निवड झाली आणि त्यानंतर राज्याच्या मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात आला. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील ओवळा माजीवाडा मतदारसंघातून निवडून आलेले प्रतापशेठ सरनाईक यांना परिवहन खात्याचे कॅबीनेट मंत्री म्हणून निवडण्यात आले. त्यावरून प्रताप सरनाईक यांचे सोलापूर मधील घनिष्ठ मित्र सुर्या ग्रुपचे संस्थापक राजकुमार सुरवसे यांनी जल्लोष केला आणि नागपूर येथे मित्र मंडळीसह जावून नामदार प्रतापशेठ सरनाईक यांना भेटून पुष्पगुच्छ देवून त्यांचा सत्कार केला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी राजन चिंचोरे यांच्यासह मित्र मंडळी उपस्थित होते. यावेळी परिवहन मंत्री नामदार प्रतापशेठ सरनाईक यांनी सोलापूरला लवकरच येणार असल्याचे आश्वासन दिले.