सोलापूर : जिल्ह्यामध्ये आज तब्बल दोन लाख कोरोना लसीचे डोस दिले जाणार आहेत त्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा जोरदार कार्यरत आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी विविध आरोग्य केंद्रांना भेटी देत पाहणी केली आरोग्य कर्मचाऱ्यांशी तसेच गावकऱ्यांची देखील त्यांनी संवाद साधला