प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात मोठी गर्दी असताना लागलेल्या आगीमुळे सर्वांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तंबूत असलेल्या सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे .
प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात आग लागल्यानंतर अग्नीशामक दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले . विवेकानंद सेवा समितीच्या टेंटला आग लागली होती. नंतर ती आग पसरत असल्याची माहिती मिळत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीमध्ये सामान जळत असल्याचे दिसून आले आहे त्यामध्ये अग्निशामक दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
भीषण आग लागल्याने आणि ही आग पसरत चालल्याने महाकुंभमेळ्यात भीती पसरली आहे. आत्तापर्यंत वीस ते पंचवीस तंबू जळाले आहेत. महाकुंभ 2025 मध्ये आतापर्यंत 7 कोटींहून अधिक भाविक सहभागी झाले आहेत.