सोलापूर:- येथील हरिभाई देवकरण प्रशाला & कनिष्ठ महाविद्यालयात कविश्रेष्ठ कुसुमाग्रज् उर्फ वि. वा.शिरवाडकर यांच्या जयंती मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. प्राचार्या दीपा फाटक उपमुख्याध्यापक रविंद्र पानसरे पर्यवेक्षक औदुंबर सर्वगोड,महेंद्र रणधीर, गणेश नेवरे ,मारुती शहाणे यांच्या हस्ते कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.









यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रशालेच्य शिक्षिका भावना यलागुलवार यांनी मराठी राजभाषा दिना विषयीं आपले विचार व्यक्त केले. यावेळी विदयार्थ्यांनीं देखिल मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमांचे प्रास्ताविक अलका जगताप यांनी तर उपस्थितांचे आभार अर्चना माका यानीं मानले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन साक्षी भट ,ऋतुजा जहागीरदार यानी केले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संगीत शिक्षिका सावनी कुलकर्णी ,ग्रंथपाल महारुद्र कत्ते , प्रशांत गायकवाड मारुती माळी यांनी सहकार्य केले.

