मराठा व कुणबी एकच या मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलन अंतर्गत शांतता रॅलीच्या दुसऱ्या
टप्प्याची सुरुवात बुधवार ७ ऑगस्ट रोजी सोलापुरातून होणार असून या शांतता रॅलीसाठी जरांगे पाटील यांचे छत्रपती संभाजी महाराज चौकात आगमन होणार आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून त्यानंतर तेथून ते रॅलीने छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करणार आहेत. त्यानंतर तेथेच उभारण्यात आलेल्या भव्य व्यासपीठावरून ते मराठा समाज बांधवांना संबोधीत करणार आहेत.
या रॅलीमध्ये कुणीही उपाशी राहू नये यासाठी स्वयंम शिक्षा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व दक्षिण सोलापूर विधानसभेचे इच्छुक उमेदवार सोमनाथ वैद्य यांनी रॅलीसाठी येणाऱ्या मराठा समाज बांधवांसाठी उपयुक्त पिठलं भाकरीचे वाटप स्वयंसेवकाच्या माध्यमातून केल्याने दक्षिण सोलापूरचे इच्छुक उमेदवार सोमनाथ वैद्य यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
महात्मा बसवेश्वर महाराजांनी सांगितलेल्या विचारातून समता, बंधूता जोपासण्याचे काम सोमनाथ वैद्य करीत आहेत..
“जनसेवा हीच ईश्वर सेवा” असे म्हणत मराठा बांधवांनी सोमनाथ वैद्य यांना दिल्या शुभेच्छाही दिल्या यापूर्वी सोमनाथ वैद्य अनेक सामाजिक उपक्रमातुन थेट जनतेसमोर जाऊन मदत करीत आहेत.