बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय तापलं आहे. या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींसह सूत्रधार म्हणून आरोप असलेल्या वाल्मिक कराडसह 8 आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. त्याआधी वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात यावा, यासाठी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाकडून आंदोलन करण्यात आलं होतं. तर दुसरीकडे वाल्मिक कराडवर मकोका लागल्यानंतर त्याच्या आई आणि पत्नीकडून देखील परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आलं होतं. कराडच्या पत्नी पत्नी मंजली वाल्मिक कराडच्या यांनी पती वाल्मिक कराडवरील सर्व आरोप फेटाळून लावत वाल्मिक कराडला अडकवण्यात येत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. सोबतच, यावेळी माध्यमांशी बोलताना कराडच्या पत्नी मंजली वाल्मिक कराडच्या यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती देखील हल्लाबोल केला आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना पत्नी मंजली वाल्मिक कराड म्हणाल्या मराठा, मराठा काय करतो. मीही 96 कुळी मराठा आहे. तुम्ही जे काही आरोप करत आहात ते आधी सिध्द करा, यांना जातीवाद करायला कोणी शिकवला, जातीवादामध्ये आणि राजकारणामध्ये माझ्या नवऱ्याचा बळी दिला जातोय, आमच्या महाराजांनी असे जातीवाद करण्यास शिकवले नव्हते. जात बघून खून किंवा गुन्हे होत नाहीत, असे म्हणत मंजली वाल्मिक कराड यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे.