मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या T20 सामन्यात भारताने पाच गडी राखून विजय मिळवला आहे. न्यूझीलंडच्या फलंदाजीदरम्यान मार्टिन गप्टिलने 18 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर दीपक चाहरच्या गोलंदाजीवर शानदार षटकार ठोकला. षटकार ठोकल्यानंतर तो काही वेळ दीपककडे पाहात राहिला. त्याने बराच वेळ दीपककडे रोखून पाहिलं आणि त्यानंतर काही वेळाने त्याने बॉल कुठे गेलाय ते पाहिलं. त्यानंतर दीपकने एक फुल लेंथ बॉल टाकला. या बॉलवर गप्टील श्रेयस अय्यरकडे झेल देत बाद झाला. त्यानंतर दीपकने गप्टीलकडे रोखून पाहिलं. दोघांचेही फोटो फोटो सोशल मीडियावर खूप शेअर होत आहेत.