• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, May 11, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

कासाळगंगा नदी प्रदूषण मुक्त करा- जिल्हाधिकारी मनिषा आव्हाळे

by Yes News Marathi
August 23, 2023
in इतर घडामोडी
0
कासाळगंगा नदी प्रदूषण मुक्त करा- जिल्हाधिकारी मनिषा आव्हाळे
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नदी प्रदुषण रोखणेसाठी प्लास्टिक मुक्तीची शपथ
सोलापूर –
कासाळगंगा नदी प्रदुषण मुक्त व बारमाही वाहते राहणेसाठी सर्वांचे प्रयत्न महत्वाचे आहेत. या साठी नदीला जाणून घ्या. कासाळगंगा नदी प्रदूषण मुक्त करा असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी केले.
कासाळगंगा नदी लोक अभ्यास व कृती अहवाल अंतर्गत आज नियोजन बैठकीचे आयोजन करणेत आले होते. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत आज ओडिएफ प्लस ला चालना देणे साठी प्लास्टिक चा वापर कमी करणे साठी सर्व उपस्थितांना शपथ देणेत आली. या प्रसंगी प्रभारी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांचे अध्यक्षते खाली या बैठकीचे आयोजन करणेत आले होते. या बैठकीस स्विडन वरून जलतज्ञ राजेंद्र सिंह, उप वनसंरक्षक धैर्यशील पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, यशदाचे निवृत्त संचालक सुमंत पांडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, जलजीवन मिशन चे प्रकल्प संचालक अमोल जाधव, सिने अभिनेते व ब्रॅन्ड अॅम्बेसिडर चिन्मय उदगीरकर व ऋतुजा बागवे व्हीसी द्वारे तर चला जाणूया नदी उपक्रमांचे राज्य कार्यकारिणी सदस्य महेंद्र महाजन, श्रीधर कुलकर्णी, गटविकास अधिकारी प्रशांत काळे प्रमुख उपस्थित होते. या प्रसंगी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी प्लास्टिक मुक्ती साठी शपथेचे वाचन केले.

प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे म्हणाल्या, नदीचे प्रदुषण रोखणे साठी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन कामे पुर्ण करा. नदीच्या क्षेत्रातील सर्व ग्रामपंचायतींनी पंधरावा वित्त आयोग व इतर निधीचे संयोगिकरण करणेत यावे. कृती अहवालातील उपाय योजनांच्या कामाचे नियोजन करा. कासाळगंगा नदीचा परिसर प्लास्टिक मुक्त करा. स्वच्छ पर्यावरणासाठी नदीला जाणून घ्या.
नदीकाठच्या परिसरात वृक्ष संवर्धन करा. कासळगंगा प्रकल्प जिल्ह्यासाठी नव्हे तर राज्यासाठी पथदर्शी असल्याचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी सांगितले.
टास्क फोर्सचे अध्यक्ष व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी कासाळगंगा नदीचे प्रदुषण रोखणे साठी सामुहिक प्रयत्नाची आवश्यक आहे.
उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी वृक्षलागवड रोजगार हमी योजनेतून करा. कासाळगंगा नदीचा परिसर हिरवा गार करा असे सांगून ग्रामपंचायती या प्रकल्पा साठी योगदान देतील असेही शेळकंदे यांनी सांगितले.
प्रकल्प संचालक अमोल जाधव यांनी कासाळगंगा नदीकाठच्या सर्व ग्रामपंचातीनी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन ची कामे पुर्ण करणेचे सुचना दिले.

जिल्हा परिषदेचे नदीसाठी योगदान कौतुकास्पद – जलतज्ञ राजेंद्र सिंह
सोलापूर जिल्हा परिषदेने नदीसाठी दिलेले योगदान कौतुकास्पद असल्याचे मत जलतज्ञ राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केले. प्रभारी जिल्हाधिकारी व सिईओ मनिषा आव्हाळे यांनी पदभार घेतले नंतर कासाळगंगा नदी चे प्रदुषण रोखणेची काम हाती घेतले आहे. या साठी अधिकारी देत असलेले योगदान खुप महत्वाचे आहे. या साठी खुप शुभेच्छा देत असल्याचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ञ राजेंद्र सिंह यांनी स्विडन येथून व्हीसी द्वारे बोलताना व्यक्त केले.

मिलेट महोत्सवाचे उदघाटन..!
कासाळगंगा नदीचे खोरे तील गावातील बचतगटांनी कडधान्या पासून बनविलेले पदार्थांचे विक्री व प्रदर्शन या निमित्ताने ठेवणेत आले होते. या मिलेट महोत्सवाचे उदघाटन प्रभारी जिल्हाधिकारी व सिईओ मनिषा आव्हाळे यांचे हस्ते करणेत आले. या प्रसंगी प्रकल्प संचालक अमोल जाधव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, महेंद्र महाजन उपस्थित होते.

Tags: CollectorKasalganga riverManisha Awhalepollution free
Previous Post

लम्पी चर्मरोगाचा प्रतिबंध, नियंत्रण व निर्मूलन करण्यासाठी सोलापूर जिल्हा नियंत्रितक्षेत्र म्हणून घोषित – जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे

Next Post

आनंदाचा परमोच्च क्षण, भारताची चंद्रावर यशस्वी स्वारी…!

Next Post
आनंदाचा परमोच्च क्षण, भारताची चंद्रावर यशस्वी स्वारी…!

आनंदाचा परमोच्च क्षण, भारताची चंद्रावर यशस्वी स्वारी…!

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group