• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, March 13, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

योगी राजेंद्र नगर, माशाळ वस्ती येथे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड; उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या हस्तक्षेपामुळे तोड थांबली

by Yes News Marathi
March 13, 2026
in इतर घडामोडी
0
योगी राजेंद्र नगर, माशाळ वस्ती येथे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड; उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या हस्तक्षेपामुळे तोड थांबली
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : शहरातील योगी राजेंद्र नगर परिसरातील माशाळ वस्ती येथे मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू असल्याची माहिती मिळताच सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. त्यांच्या हस्तक्षेपामुळे सुरू असलेली वृक्षतोड तात्काळ थांबवण्यात आली.

स्थानिक नागरिकांकडून परिसरातील मोकळ्या जागेत मोठ्या झाडांची बेकायदेशीरपणे तोड सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर उपमहापौर देवकर यांनी तत्काळ संबंधित ठिकाणी धाव घेतली. तेथे मशीनच्या सहाय्याने झाडे तोडण्याचे काम सुरू असल्याचे आढळून आले. यावेळी त्यांनी संबंधितांना कडक शब्दांत जाब विचारत वृक्षतोड त्वरित बंद करण्याचे आदेश दिले.

उपमहापौर देवकर यांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना संबंधित मशीन जप्त करण्याबाबत तसेच वृक्षतोडीत सहभागी असलेल्या संबंधित व्यक्ती, ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पर्यावरणाला हानी पोहोचवणारी अशी बेकायदेशीर वृक्षतोड कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून शहरातील मोकळ्या जागांमधील झाडांचे संरक्षण करण्यासाठी महापालिकेने अधिक कठोर पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, उपमहापौर देवकर यांच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे सुरू असलेली वृक्षतोड थांबवण्यात आल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Previous Post

शासकीय योजना व सर्व रुग्णालयांसाठी नियमित व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध होणार- प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम

Next Post

२४२ महिला सुरक्षा रक्षकांचा दिक्षांत संचलन सोहळा उत्साहात

Next Post
२४२ महिला सुरक्षा रक्षकांचा दिक्षांत संचलन सोहळा उत्साहात

२४२ महिला सुरक्षा रक्षकांचा दिक्षांत संचलन सोहळा उत्साहात

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In