सोलापूर: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० देश घडविण्याची नवीन संधी आहे. परफार्मिंग असेट फलित रूपातील लाभांश समाजाला मिळत असेल तर देश नेहमीच पुढे असेल. शैक्षणिक क्षेत्रातून काळानुरूप अपेक्षित फलित मिळत नसेल तर देशाला अनर्थाला पुढे जावे लागेल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी जून २०२३ पासून सुरु होत आहे. या शिक्षण धोरणाची अंमलबजावणी गंभीरपणे करावी आणि महाराष्ट्राची प्रबोधनपर भूमिका या धोरणातही टिकवून ठेवावी असे विचार डॉ. शैलेंद्र देवळाणकर, संचालक उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य यांनी प्रकट केले. ते येथील द. भै. फ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय येथे सकाळच्या सत्रात दयानंद महाविद्यालयाच्या शिक्षकांना आणि दुपारच्या सत्रात विद्यापीठ कार्यक्षेत्रातील शहर व जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या प्राचार्यांना त्यांनी मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदार्भातील महत्वाच्या शंका, नवीन धोरणातील स्तरबद्ध रचना, +४ वर्षे संबंधाचा संभ्रम त्यांनी नाहीसे केले. नवीन शैक्षणिक धोरण महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमध्ये एकवाक्यता आणणारे असेल विद्यार्थ्यांना कोणत्याही वर्षाला कोठेही प्रवेश घेते येईल त्याचसोबत इतर लवचिकता त्यांनी ओघवत्या भाषेत स्पष्ट केले. त्यांच्या भाषणात एबीसी (अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडीट) १००% पूर्ण करणे, IDP व AAA आणि GEO TAGGING OF INSTITUTION या मुद्दांचे महत्वही त्यांनी प्राचार्य वर्गास पटवून दिले.
याप्रसंगी सहशिक्षण संचालक डॉ. उमेश काकडे, दयानंद शिक्षण संस्था, सोलापूर प्रशासक डॉ. विजयकुमार उबाळे, द. भै. फ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालाचे प्राचार्य डॉ. बी. एच. दामजी, डीएव्ही वेलणकर कॉलेज ऑफ कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. शिंदे, दयानंद विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. एम. राव, छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल बारबोले, संगमेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र देसाई, सोशल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ई. जा. तांबोळी, वैराग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सूर्यवंशी, अक्कलकोट महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अडवीतोट यांच्या समवेत प्राचार्य प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विजयकुमार उबाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ. यु. एम. राव यांनी केले.