सोलापूर : सात IAS अधिकाऱ्यांच्या महाराष्ट्र शासनाने बदल्या केल्या आहेत. यामध्ये सोलापूर झेडपीच्या सीईओ मनीषा आव्हाळे यांची पुणे येथे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या सीईओ पदी बदली करण्यात आली आहे. बदल्या झालेल्या अधिकारी पुढील प्रमाणे
- अभिनव गोयल यांची नियुक्ती जिल्हाधिकारी, हिंगोली या पदावर.
- विनायक महामुनी यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर या पदावर.
- सतीशकुमार खडके यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड या पदावर.
- सौम्या शर्मा चांडक मुख्य कार्यकारी अधिकारी, नागपूर यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी,स्मार्ट सिटी नागपूर या पदावर.
- मनीषा आव्हाळे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, पुणे या पदावर.
- कुलदीप जंगम, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बुलढाणा यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर या पदावर.
- प्रदीप कुमार डांगे यांची नियुक्ती आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, नवी मुंबई या पदावर.