प्रिसिजन फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रिसिजन प्रीमियर लीग या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा दि. ११ ऑकटोबर आणि १८ ऑकटोबर २०२३ या कालावधीत सेंट्रल रेलवेच्या मैदानावर संपन्न झाल्या. स्पर्धेत एकूण ०८ संघ सहभागी होते. दिनांक १८ ऑक्टोंबर २०२३ रोजी सेमी फायनल व फायनल मॅच झाल्या. पहिली सेमीफायनल मॅच फौंड्री ४ लॉयन्स विरुद्ध फौंड्री २ वॉरियर्स दुसरी सेमीफायनल मॅच मशीन शॉप २ ब्लास्टर्स विरुद्ध फौंड्री १ चॅम्पियन अशा झाल्या त्यातून फौंड्री २ वॉरियर्स व मशीन शॉप २ ब्लास्टर्स या दोन्ही टीम मध्ये अंतिम सामना झाला.
मशीन शॉप २ ब्लास्टर्सने 8 ओव्हर मध्ये ८३ धावांचे तगडे आव्हान फौंड्री २ वॉरियर्स टीम समोर ठेवले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या मॅच मध्ये १४ रन्सनी मशीन शॉप २ ब्लास्टर्सने हा अंतिम सामना जिंकला. या स्पर्धेमध्ये अन्य ही भरघोस बक्षिसे ठेवण्यात आली होती.
फायनल विनर – मशीन शॉप २ ब्लास्टर्स
फायनल रनर अप – फौंड्री २ वॉरियर्स
मॅन आफ द सिरिज- अक्षय गोसावी
बेस्ट बॉलर – जिशान पटेल
बेस्ट बॅट्समन – अक्षय गोसावी
या स्पर्धेचा बक्षीस समारंभ प्रिसिजन कॅमशॉफ्ट लिमिटेड चे चेअरमन यतीन शहा प्रिसिजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ सुहासिनी शहा, मुख्य वित्तीय अधिकारी रवींद्र जोशी, सीओओ अनितपाल सिंह व एच आर जनरल मॅनेजर यांच्या उपस्थितीत झाला. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी माधव देशपांडे, योगेश होसमनी, अनंत परळकर, संदीप पाटील, बाळू पांढरे, साबीर शेख, महेश फापागिरे, संदीप कलबुर्गी, शिवराज सावंत,वैशाली बनसोडे, संदीप पिसके, आदींनी परिश्रम घेतले.