सोलापूर दि.9 (जिमाका):- श्री. सिध्देश्वर यात्रा महोत्सव सन 2025 निमित्त सोलापूर शहरात सार्वजनिक शांतता राखणे आवश्यक असल्याने ,महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम मधील कलम 142 अन्वये प्रदाने करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, दि. 13, 14 व 15 रोजी सोलापूर शहरातील सर्व देशी व विदेशी, ताडी विक्री अनुज्ञप्तीचे व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
संबंधित अनुज्ञप्तीधारकांनी दि. 13 जानेवारी 2025 सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत, दि. 14 जानेवारी 2025 सायंकाळी 7.00 वाजलेनंतर व दि. 15 जानेवारी 2025 सायंकाळी 5.00 वाजलेनंतर बंद ठेवावीत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यां विरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही नमूद करण्यात आले आहे.