सोलापूर : सोलापूर : श्री संत ज्ञानेश्वर महाराज मृदंग वादन शिक्षण संस्था कडून मृदंग तपस्या वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार व्हावा वारकरी संप्रदायची आवड, गोडी निर्माण व्हावी तरुण पिढी सुसंस्कृत घडावी या उद्देशाने श्री महादेव मंदिर जुनी लक्ष्मी चाळ सोलापूर कडून प्रती वर्षा प्रमाणे यंदाही ह.भ.प.ज्योतीराम महराज चांगभले यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ८ एप्रिल ते ८ मे २०२४ दरम्यान मृदंग तपस्या मोठ्या उत्साहाने पार पडला.
विद्यार्थ्यांकडून दररोज मृदंग वादनाचा सराव त्यानंतर वारकरी पाऊल,श्री संत ज्ञानेश्वर महाराज कृत हरिपाठ असा दिनक्रम होता. यामध्ये शास्त्रीय मृदंग वादन, वारकरी सांप्रदायिक मृदंग वादन तसेच संगीत भजन ,कीर्तन ,भारुड , या मध्ये मृदंग वादनाची साथ कशी करावी याचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच या संस्थेचा अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मुंबई मृदंग वादन परीक्षा 100% निकाल लागला असून त्या परीक्षेचे प्रमाणपत्र वाटप संगीत विशारद संभाजी घुले व अखिल भाविक वारकरी मंडळ राष्ट्रीय सचिव हभप बळीराम महाराज जांभळे यांचे करण्यात आले. सदर मृदंग तपस्या कार्यक्रमात ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश चांगभले, विजय परबत, दक्ष वारे आणि प्रणिती चांगभले यांनी परिश्रम घेतले