एमआयटी कॉलेज येथे लैंगिक शिक्षण या विषयावर व्याख्यान
सोलापूर – वयात आलेल्या प्रत्येक मुलाला व मुलीला लैंगिक शिक्षण देणे हे प्रत्येक शैक्षणिक संस्थेची व कुटुंबाची जबाबदारी आहे. लैंगिक शिक्षण ही काळाची गरज असून याद्वारे संस्कारीत पिढी घडवण्यास मदत होते असे प्रतिपादन प्रसिद्ध डॉ. सचिन जम्मा व डॉ. अंजली जम्मा यांनी केले.
एमआयटी ज्युनिअर कॉलेज येथे बुधवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी विज्ञान व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी लैंगिक शिक्षण या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
वयात येताना होणारी शारीरिक व मानसिक बदला विषयी बऱ्याच वेळा मुलांना कोणाशी चर्चा करावी याबद्दल नीटसे कळत नाही, त्यामुळे अनेक वेळा गैरसमज निर्माण होत असतात ,अशा वेळी पालक, शिक्षकांनी योग्य ते मार्गदर्शन लैंगिक शिक्षणावर केले पाहिजे असे मत प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ अंजली जम्मा व्यक्त यांनी केले. लैंगिक शिक्षण याविषयी मुलांना पाॅवर पॉइंट च्या साह्याने शरीर रचना शास्त्र विषयी सविस्तर माहिती दिली. त्याचप्रमाणे मुलांच्या शंका व प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयटी ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य डॉ. स्वप्नील शेठ हे होते. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शामसुंदर माने यांनी केले, तर तांत्रिक साहाय्य प्रा. स्वप्निल कोंडगुळे यांनी केले. प्रस्ताविक प्रा. अमोल गजधाने यांनी केले, तर आभार प्रा. वंदना कोपकर यांनी मानले. याप्रसंगी कॉलेजचे शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी -विद्यार्थिनी सहभागी झाले होते.