सोलापूर: जूनी मिल कंपाऊंड सुपर मार्केट येथील राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण महर्षी स्वर्गीय तात्यासाहेब कोठे यांची 86 वी जयंती विधायक उपक्रमाने साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम प्रमुख पाहुणे उपसंपादक श्री. श्रीनिवास दासरी, रॉबीन हूड आर्मी चे संस्थापक श्री. हिंदुराव गोरे, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष इस्माईल बागवान, डॉ. विणा कणबसकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रोहिणी सुरा यांच्या हस्ते स्व.विष्णुपंत तात्यासाहेब कोठे, स्व.कौशल्य काकू कोठे,स्व. राजेश आण्णा कोठे, विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करुन सदर कार्यक्रम ची सुरुवात करण्यात आली.
या नंतर सदर जीवन प्रेरणा दीन व जयंती चे औचित्य साधून कारंभा येथील स्नेहालय व भोगाव येथील आधार केअर सेंटर येथे शाळे मार्फत देण्यात येणाऱ्या धान्य व खेळाचे साहित्य यांचे पूजन प्रमुख पाहुणेच्या हस्ते पूजन करण्यात आले.
या नंतर शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे यांचा सत्कार करण्यात आला. या नंतर सहशिक्षका सौ. सरस्वती जवळकर यांनी स्व. विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या बद्दल आपल्या मनोगत व्यक्त केले. तसेच प्रमुख पाहुणे यांनी देखिल विद्यार्थ्याना मोलाचे मार्गदर्शन केले. या वेळी शाळेतील विद्यार्थ्यानं करीता वॉल हँगिंग, पेपर बुके, फुलांची सजावट, कोलाज वर्क, हस्तक्षार, भेट कार्ड अश्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्था अध्यक्ष माननीय श्री. महेश अण्णा कोठे, माननीय डॉक्टर सौ. राधिका ताई चिलका, माननीय डॉ. श्री. सूर्यप्रकाश कोठे, माननीय श्री. देवेंद्र दादा कोठे, माननीय श्री .प्रथमेश दादा कोठे, प्राध्यापक विलास बेत तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रोहिणी सुरा यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.