सोलापूर : सकाळपासून अवघे तीस रुपयांची विक्री झाली आहे बघा .करूना मुळे धंद्यावर परिणाम झालाय .25 पैशाला एक या भावाने 1982साली भाकर विकायला सुरुवात केली .आज तीच भाकरी 12 रुपयाला आमटी भाजी आणि ठेचा सह देत असल्याचे श्रीमती लक्ष्मी महादेव कुंभार या फुटपाथवर खानावळ चालवणाऱ्या महिलेने सांगितले. मावशी आज जागतिक महिला दिन आहे, असे म्हणताच त्या म्हणाल्या होय बरोबर म्हणूनच आज पुरणपोळ्या ची ऑर्डर घेतली आहे बघा. 25 रुपयाला पुरणपोळी आणि कटाची आमटी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चपाती ची थाळी दहा रुपयात भाताची थाळी पंधरा रुपयात असल्याचे सांगताना लक्ष्मी कुंभार म्हणाल्या, आम्ही आमटी भाजी खर्ड्याचे वेगळे पैसे लावत नाही बघा. एकुलती एक मुलगी आणि तिच्या चार नातींना नेटाने सांभाळणाऱ्या लक्ष्मी मावशींनी या फुटपाथवरील खानावळी साठी विजेचे कनेक्शन देखील घेतले आहे. गॅसच्या शेगड्यावर – सकाळी ज्वारीच्या पांढर्याशुभ्र पंचवीस ते तीस भाकरी आणि दहा ते पंधरा चपाती त्या करून ठेवतात .त्यानंतर बेसन एखादी भाजी आणि ठेचा तयार झाला की मावशींची खानावळ सुरू होते. ग्राहकांना बसायला पोत्याचा छोटासा तुकडा दिला आणि ग्लासभर पाणी ठेवले की लगेच थाळी दिली जाते . ग्राहकाने ऑर्डर दिल्यानंतरच थाळीमध्ये पदार्थ वाढले जातात अनेक जण येतात पोटभर जेवतात आणि ढेकर देऊन मावशींना धन्यवाद देतात . काही जण पार्सलही नेतात मावशींना त्यांची खानावळ महापालिकेत अधिकृतपणे नोंद करायची इच्छा आहे. मात्र याच फुटपाथवर आता महापालिकेने गाळे बांधायचे ठरवले आहे म्हणून त्यांना गाळे बांधल्यावर तुम्हाला जागा देऊ असे सांगत महापालिकेतील लोक परत पाठवतात . गेली 28 वर्षे याच ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या मावशींना पालिका अतिक्रमण विभागाचे अधिकारी , पोलीस असा कोणाचा आहे त्रास होत नाही.