येस न्युज मराठी नेटवर्क : बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक कुमार सानू यांना करोनाची लागण झाली आहे. कुमार सानू यांच्या टीमने फेसबुकद्वारे चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली. ‘दुर्दैवाने सानूदा यांच्या करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कृपया त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा’, अशी पोस्ट फेसबुकवर करण्यात आली आहे. अमेरिकेत काही दिवस पत्नी सलोनी आणि मुली शनॉन व अॅनाबेल यांच्यासोबत राहण्याचा प्लॅन करत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. येत्या २० ऑक्टोबर रोजी त्यांचा वाढदिवस असून हा दिवस कुटुंबीयांसोबत घालवण्याची त्यांची इच्छा होती.