No Result
View All Result
- सोलापूर : जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासकपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या जागेवर नियुक्त झालेले नवे जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी सोमवारी सकाळी भोळे यांच्याकडून पदभार घेतला. पहिल्याच दिवशी त्यांच्या कामात सकारात्मकता पाहायला मिळाली.
- पत्रकारांशी बोलताना गायकवाड यांनी सोलापूर जिल्ह्यातील अवैध सावकारकी, बाजार समितीमध्ये सुधारणा तसेच बँकांची थकीत कर्जे यावर भाष्य केले. ते म्हणाले, खाजगी सावकारकीच्या जिल्ह्यात अनेक तक्रारी आहेत. सर्व तक्रारीची शहानिशा करून त्या 3 ते 4 महिन्यात निकाली काढल्या जातील, असे सांगत जिल्ह्यातील अवैध सावकारकी मोडीत काढण्याचा इशारा त्यांनी दिला. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भविष्यात सर्व बाबी ऑनलाइन करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल या दृष्टीने प्रयत्न राहतील. बँका बंद पडण्यापेक्षा त्या कशा चालू राहतील यासाठी प्रयत्न असेल, कर वसुलीवर फोकस राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
- गायकवाड हे 2003 साली मुंबई येथे कस्टम ऑफिसर होते, 2007 ते उपमुख्य कार्यकारी अधिकारी झाले नंतर त्यांचा ओढा हा सहकारी संस्थाकडे वाढला ते 2009 साली जिल्हा उपनिबंधक झाले.
No Result
View All Result