सोलापूर : वै.ह.भ.प. पांडुरंग सोपान क्षिरसागर यांच्या १६ व्या पुण्यतिथी निमित्त किर्तन सेवा घेण्यात आली. मित्ती आषाढ वद्य ६ शके १९४६, २६ जुलै २०२४ शुक्रवार रोजी सायं ७ ते ९ या वेळेत आयोजित केली आहे. सर्व वारकरी भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
माझ्या वडिलांची मिरासी गा देवा ।
तुझी चरण सेवा पांडुरंगा ।।
या किर्तन सेवेचे प्रेरणास्थान ह.भ.प. गुरुवर्य शंकर काळे (गुरुजी) असून हि सेवा श्रीगुरु ह.भ.प. कान्होबा महाराज देहूकर, पंढरपूर जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे विद्यमान वंशज यांच्या कीर्तनाचे एन.जी. मिल चाळ, बाल हनुमान भजनी मंडळ, सोलापूर येथे संपन्न झाली. या वेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, युवा नेते अमोल भोसले,यांच्या हस्ते कान्होबा महाराजांचा सत्कार करण्यात आला.
कान्होबा महाराज देहूकर यांनी आपल्या कीर्तनातून संत परंपरेची माहिती देत मानवाने आजच्या युगात कसे बोलावे वागावे राहावे याविषयी प्रबोधन केले. यासह कोणाविषयी द्वेष भाव मच्छर मनात न ठेवता खुल्या मनाने संतांनी दिलेल्या मार्गावर चालत आपल्या जीवनाचे सार्थक करून घ्यावे असे सांगत याविषयी उदाहरण देत सर्वांना संतांच्या कार्याची माहिती दिली कानोबा महाराज देवकर यांच्या कीर्तनात भक्तगण तल्लीन झाले होते.
ह.भ.प. नितीन पांडुरंग क्षिरसागर, ह.भ.प. माऊली क्षिरसागर (मृदंगवादक), अखिल भाविक वारकरी मंडळ, सोलापूर, श्री बाल हनुमान भजनी मंडळ, एन.जी. मिल चाळ, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने तर हगलूर भजनी मंडळ, उळेगांव भजनी मंडळ, होनसळ भजनी मंडळ, राळेरास भजनी मंडळ, कोंडी भजनी मंडळ, खेड भजनी मंडळ, केगांव भजनी मंडळ, गंगेवाडी भजनी मंडळ, सलगर वस्ती भजनी मंडळ, मार्डीगांव भजनी मंडळ यांचे विशेष सहकार्य लाभले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागनाथ पाटील साहेब सुभाष शिंदे महाराज लक्ष्मण देवकते महाराज ज्योतीराम चांगभले महाराज शामसुंदर येदूर महाराज तुकाराम क्षीरसागर महाराज यांचे विशेश सहकार्य लाभले.