सोलापूर : डी. के. मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत के. राज फिटनेस जिमने घवघवीत यश संपादन केले.
५५ वजनी गटात नितीन बाडीवाले यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर ६० किलो वजनी गटात नीलेश लंगडेवाले यांनी प्रथम क्रमांक पटकाविला व त्यासोबत बेस्ट इम्प्रोव्हर सन्मान मिळविला. ७० किलो वजनी गटामध्ये रविकांत होनमारे यांनी प्रथम क्रमांकासोबत बेस्ट पोझर हा बहुमान मिळविला. वरील सर्व स्पर्धकांना तयार करण्यासाठी फिटनेसचे डायटिशियन व ट्रेनर ऋषिकेश यांनी परिश्रम घेतले.