सोलापूर : अखिल भाविक वारकरी मंडळ यांचे माध्यमातून कार्यकारीणी बदल करतेवेळी तालुका, जिल्हा, विभाग आणि प्रदेश असे सर्व पदाधिकारी बदलण्यात येत होते. त्यामध्ये प्रदेश अध्यक्षपदी ह.भ.प.ज्योतीराम चांगभले यांची निवड करताना ह.भ.प. भागवत महाराज चवरे पंढरपूर (राष्ट्रिय उपाध्यक्ष) यांनी सूचना मांडली आणि महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ह भ प भास्कर भांगे यांनी अनुमोदन देऊन एकमताने निवड करण्यात आली. 2007 साली ह भ प जोतिराम चांगभले यांना सोलापूर शहर अध्यक्ष जबाबदारी देणेत आली. व 2019 साली सोलापूर जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. शिवाय त्यांनी महाराष्ट्र राज्य भजन स्पर्धेत दोन वेळा प्रथम क्रमांक पटकावला आहे. भजन, भारूड, कीर्तन, ई. सर्व प्रकारचे वाद्य वादन करतात. सोलापूर शहर व जिल्ह्यातील अनेक मुलांना मृदंग वादनाचे शिक्षण देण्याचे अनमोल कार्य चालू असून तो अनुभव आणि त्यांची काम करण्याची पद्धत पाहून त्यांच्याकडे प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी देणेत आली आहे , असे राष्ट्रिय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांनी निवडी प्रसंगी म्हटले होते.
” मेळविली मांदी वैष्णवांची”
श्री संत ज्ञानेश्वर महाराजानी 12 व्या शतकामध्ये त्या काळातील सर्व संताना एकत्रित करून वारकरी संप्रदायाच्या वाढीसाठी प्रयत्न केले होते. त्याच वाटेवरून जाण्यासाठी प्रयत्न व्हावा म्हणून वारकरी संप्रदायाचा प्रचार – प्रसार करण्यासाठी आवश्यक अशी कार्यकारीणी करणे गरजेचे आहे. शिवाय सर्वांना एकत्रित करून वारकरी संप्रदायाच्या वाढीसाठी आवश्यक ते सर्व बदल करण्याची कुवत पाहून ही निवड करण्यात आली आहे. या निवडी साठी राष्ट्रिय अध्यक्ष
ह.भ.प.सुधाकर महाराज इंगळे यांनी गौरवोद्गार काढले व अभिनंदन ही केले. महाराष्ट्रातील अनेक संघटनांनी व भाविकांनी अभिनंदन केले आहे.